corona update 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यातील मृत्यू नियंत्रणात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात आज केवळ 53 कोविड बाधित रुग्ण दगावले. नागपूर आणि औरंगाबाद मंडळात आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही. तर अकोला मंडळात केवळ एका मृत्यूची नोंद झाली. कोल्हापूर मंडळात सर्वाधिक 22 तर ठाणे 16, पुणे 9, नाशिक 2 तर लातूर मंडळ 3 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.9 % इतका आहे.तर मृतांचा एकूण आकडा 1,31,605 वर पोहोचला आहे.

राज्यात आज दिवसभरात 4,877 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,69,799 झाली आहे.राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 88,729 इतकी आहे. आज दिवसभरात 11,077 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,46,106 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 % एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,69,95,122 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,69,799 (13.34 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,01,758 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,518 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT