विजय मल्ल्या दिवाळखोर घोषीत! संपत्ती ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा

युकेच्या हायकोर्टानं घोषित केलं दिवाळखोर
vijay mallya
vijay mallya

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नऊ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला युकेच्या हायकोर्टानं मोठा झटका दिला आहे. हायकोर्टानं मल्ल्याला दिवाळखोर घोषीत केलं असून भारतीय बँकांना त्याच्या जगभरातील कुठल्याही संपत्तींचा ताबा घेण्यास परवानगी दिली आहे.

युकेच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार, दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी कंपनी न्यायालयाचे न्यायाधीश मायकल ब्रिग्ज यांनी हायकोर्टात व्हर्च्युअली सुनावणी घेतली. यावेळी त्यांनी विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषीत केलं. भारतीय बँकांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या लॉ फर्म टीएलटी, एलएलपी आणि बॅरिस्टर मार्सिया शेकरडेमियन यांनी युक्तीवाद करताना भारतीय बँकांच्या बाजूने विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषीत करण्याची मागणी केली होती. मल्ल्याचा प्रत्यार्पणाचं प्रकरण वेगळं आहे यावर जोपर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मल्ल्या ब्रिटनमध्ये जामीनावर राहू शकतो, असंही त्यांनी कोर्टात म्हटलं होतं.

vijay mallya
प्रशांत किशोर यांची टीम नजरकैदेत; तृणमूल काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

दरम्यान, यापूर्वी भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली एका कन्सोर्टिअमनं एप्रिल महिन्यात लंडनच्या हायकोर्टात सुनावणीदरम्यान फरार मल्ल्याला दिवाळखोर घोषीत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. कारण, विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्ससाठी घेतलेलं हजारो कोटींचं कर्ज अद्याप वसूल झालेलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com