Cyclone Mocha Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Cyclone Mocha Update: 'या' राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोचा चक्रिवादळ रविवारी म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोचा चक्रिवादळ काल म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या वादाळाचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांचा किनारी भाग हाय अलर्टवर आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, लाईव्ह गार्ड्स एनडीआरएफची पथकांसह दिघा-मंदारमणी किनारी भाग देखील सतर्क आहे. तसेच लोकांनी समुद्राजवळ किंवा समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तर हवामान विभागानं नियमावली जारी केली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोचा चक्रिवादळ रविवारी म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले. म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर या वादळाचा प्रभाव काही अंशी कमी झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मोचा वादळाचा परिणाम म्हणून दिल्ली -एनसीआरसह पंजाब, हरियाणा, चंदीगड तसेच राजस्थानच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्याचबरोबर ईशान्य भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पूर्व भारतात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आला आहे. पूर्व भारतात कमाल तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT