Uddhav-Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्तेचे विकेंद्रीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - महाविकास आघाडी सरकारचे आज खातेवाटप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे मोठी खाती न ठेवता शिवसेनेसह मित्रपक्षांच्या मंत्र्यांना महत्त्वाच्या खात्यांचे वाटप करीत सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, शिवसेनेत क्रमांक दोनचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास हे संवेदनशील खाते देऊन त्यांच्यावर विश्‍वास दाखविला आहे.

मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख असल्याने त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क आणि विधी व न्याय विभाग असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या या खात्यांसह माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी आहे. या आधीच्या अनेक सरकारांमध्ये नगरविकास खाते स्वतःकडे ठेवण्याची मुख्यमंत्र्यांची परंपरा उद्धव ठाकरे यांनी या वेळी मोडीत काढली आहे. नगरविकास खाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. या खात्यात काही अनुचित प्रकार घडल्यास थेट मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्‍यात येत असते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असल्याने या दोन्ही पक्षांच्या वाट्याला मोठी खाती देण्यात आली आहेत. गृह खाते सुरुवातीला शिवसेनेकडे असताना ठाकरे यांनी ते राष्ट्रवादीला दिले आहे. तसेच, मोठ्या खात्यांसाठी स्वतःच्या पक्षात नाराजी ओढविण्याची शक्‍यता असतानाही त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती देत मित्रपक्षांवर विश्‍वास दाखविला आहे. मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याचा निर्णयही उद्धव ठाकरे घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने सत्तेचे विकेंद्रीकरण केल्याचे मानण्यात येते.

महाराष्ट्राला आता शांत झोप लागेल. भाजपचे लोक निराशेच्या गर्तेत अडकले आहेत. सत्ता गेल्यानंतर भाजपला मानसिक धक्‍का. नूतन मंत्री नंबर एकचे काम करणार.
- शंभूराज देसाई, शिवसेना, गृहराज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT