Shivsena Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: 'सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता....'; अनिल परबांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर लवकरच सुनावणी पार पडणार आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर लवकरच सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढील आठवड्यात ही सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा या सुनावणीला सुरुवात होणार आहे. येत्या काही दिवसात शिवसेनेतील चित्र स्पष्ट होणार आहे. या संपुर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाष्य केलं आहे.

बोलताना अनिल परब म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी नाराजी व्यक्त केली तेव्हा आता सुनावणी सुरू होत आहे. अजुन सुनावणी सुरू झालेली नाही. फक्त पहिल्या नोटीसा निघाल्या. काहीही कारणे देऊन आम्हाला कागदपत्र मिळाली नाहीत, असं सांगून वेळ मारून नेली, असा हल्लाबोल अनिल परब यांनी शिंदे गटावर केला आहे.

'आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीमध्ये अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे. एक आठवड्याच्या आत सुनावणी घ्यायची आहे, त्यानंतर संपुर्ण कार्यक्रमाचे शेड्यूल द्यायचे आहे. त्यामुळे आता कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना निर्णय घ्यावाच लागेल', असंही पुढे अनिल परब म्हणाले आहेत.

'त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये देखील त्यांनी टंगळमंगळ केली आहे. मी माझं परिषदेमध्ये भाषण करताना म्हटलं होतं. सर्वसाधारण नियम आहे. सभापती किंवा उपसभापती हे अपात्रतेची याचिका ऐकतात. पंरतु उपसभापती यांच्यावरच अपात्रतेची याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे हे ऐकणार कोण?', असंही परब बोलताना म्हणालेत.

'तर आमदार अपात्रतेच्या बाबतीत कोणीतरी जेष्ठ सदस्य नियुक्त करेल आणि त्याच्याकडे हे प्रकरण जाईल. पंरतु आतापर्यंत कोणताही सदस्य नियुक्त करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर जे दुसरे दोन सदस्य आहेत. मनिषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांची याचिका सभापती ऐकतील. जोपर्यंत अपात्रतेवर निर्णय होत नाही. तोवर त्या सभापती राहतील. त्यांना ऐकण्याचा आधिकार आहे. असा निर्णय त्यावेळचे तालिका सभापती निरंजन डावखेरे यांनी दिला होता. पंरतु आता या सर्व गोष्टी आता चॅलेंज होणार आहेत', असंही ते पुढे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थ्यांचा निर्लज्जपणे राजकारणासाठी वापर, धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका

Delhi Police DCP Sandeep Lamba : पोलिसांनी मुलींवर कानाखाली मारणे कायद्यात बसतं का?, डीसीपी संदीप लांबांनी तरूणीला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांनी घेरलं

Live Updates Marathi : दिल्लीतील जंतरमंतरवर भर पावसात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Pune Rain: धरणसाखळीला पावसाचा जबरदस्त बूस्ट! अवघ्या २४ तासांत १,३८० एमसीएफटी पाण्याची आवक, साठा ७३% वर

Priyanka Gandhi: ‘आंदोलन दडपण्याचा सरकारला अधिकार नाही’; सुटकेनंतर प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT