Maharashtra Corona Update Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट 91 टक्क्यांवर

राज्यात एकूण 3 लाख 83 हजार 253 अॅक्टिव्ह रुग्ण रुग्ण आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्याच्या दिवसभरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गुरुवारी घट झाली. बाधित रुग्णांच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे झाल्याने राज्याचा रिकव्हरी रेट 91.43 टक्क्यांवर पोहोचला. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. (Decline no of corona patients in state recovery rate at 91 percent)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी 29,911 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, बुधवारी 34,031 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 54,97,448 झाली आहे. आज 47,371 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण 50,26,308 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आलं. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.43 टक्के एवढं झालं आहे. राज्यात आज रोजी एकूण 3,83,253 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आज 738 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण 738 मृत्यूंपैकी 429 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 309 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. राज्यातील कोविड 19 आकडेवारीचे 13 मे पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यांच्या मृत्यू संख्येत वाढ झाल्याने राज्याच्या मृत रुग्णांच्या प्रगतीपर आकडेवारीत 246 ने वाढ झाली आहे.

राज्याचा मृत्यूदर १.५५ टक्के

तसेच इतर कारणाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये 33 ने घट झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.55 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,21,54,275  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,97,448 (17.09 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 29,35,409 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT