'अ‍ॅम्फोटेरिसिन'चा प्रश्न लवकरच सुटेल; केंद्राची ग्वाही

ब्लॅक फंगस आर्थात म्युकरमायकोसिस या आजारावर हे औषध प्रभावी आहे.
amphotericin-b
amphotericin-be-sakal

नवी दिल्ली : ब्लॅक फंगस आर्थात म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजारावरील औषध 'अ‍ॅम्फोटेरिसिन बी' चा सध्या देशात तुटवडा आहे. पण लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. लवकरच आणखी पाच कंपन्यांना हे औषध बनवण्याची परवानगी देण्यात येईल, असं रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviy) यांनी स्पष्ट केलं आहे. (Mucormycosis curing drug Amphotericin B shortage will be resolved soon says govt)

मांडवीय म्हणाले, "म्युकरमायकोसिसवरील औषध 'अॅम्फोटेरेसिन बी'च्या तुटवड्याचा प्रश्न लवकरच निकाली लागेल. येत्या तीन दिवसांत पाच नव्या फार्मा कंपन्यांना भारतात या औषधांचं उत्पादन करण्याची परवानगी मिळेल. देशात सहा फार्मा कंपन्या आधीपासूनच हे औषध तयार करत आहेत"

amphotericin-b
शरजील उस्मानीवर आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी गुन्हा दाखल

देशात सध्या म्युकरमायकोसिस आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना या आजाराला महामारी म्हणून अधिसूचित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पण सध्या जीवघेण्या आणि महागड्या आजारावर उपचारांसाठी आवश्यक असलेलं इंजेक्शन 'अॅम्फोटेरिसिन बी' चा देशात मोठा तुटवडा आहे. सध्या सहा कंपन्या हे औषध बनवतं आहे पण तेही अपुरं पडत आहे. त्यामुळे आणखी पाच कंपन्यांना या औषधाच्या निर्मितीची परवानगी मिळाल्यास एकूण ११ फार्मा कंपन्या याचं उत्पादन सुरु करतील त्यामुळे या इंजेक्शनच्या तुटवड्यााच प्रश्न मार्गी लागेल.

amphotericin-b
गोवा : कोरोना रोखण्यात भाजप सरकार फेल; 'आप'चा आरोप, हेल्पलाइन सुरु

दरम्यान, कालच राज्य शासनाने केंद्राकडे आम्हाला या इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. राज्य सरकार हे इंजेक्शन खरेदी करेल पण त्याच्या निर्मिती आणि खरेदीचं नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे, त्यामुळे याला केंद्रानं त्वरीत परवानगी द्यावी असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. यानंतरच केंद्र सरकारने नव्या पाच कंपन्यांना परवानगी देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com