Buldana 
महाराष्ट्र बातम्या

Buldana Name Change: आता बुलडाण्याच्या नामांतराची मागणी; मुख्यमंत्र्यांकडं केली 'ही' मागणी

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतरानंतर आता आणखी एका जिल्ह्याच्या नामांतराची मागणी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतरानंतर आता बुलडाणा जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनी रॅली काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं आहे.

बुलडाणा जिल्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे ठिकाण शिवरायांच्या आई जिजाऊंचं जन्मस्थळ आहे. या शहराचं नाव जिजाऊनगर करण्याचा प्रस्ताव आहे. पण सिंदखेडराजा हेच नाव कायम ठेऊन बुलडाणा जिल्ह्याचं नाव जिजाऊनगर करावं अशी मागणी लखुजीराव जाधव यांनी केली आहे.

जाधव यांनी म्हटलं की, "सिंदखेडराजा या शहराचं नाव कायम ठेवण्यात यावं. या शहराचं नाव जिजाऊ नगर करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो शासनानं रद्द करावा. तसेच आपल्याला जिजाऊनगर हे नाव द्यायचं असेल तर बुलडाणा जिल्ह्यालाच हे नाव देण्यात यावं"

"जिजाऊंनी पुणे शहर वसवलं त्या पुण्याचं नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी नुकतीच करण्यात आली होती. पण ही मागणी चेकमेट करण्यासाठी सिंदखेडराजाचं नाव जिजाऊनगर करण्याची मागणी करण्यात आली असावी, असं आम्हाला वाटत आहे. पण खरंच जर सरकारला जिजाऊनगर असं नामांतर करायचं असेल तर ते एकतर पुणे जिल्ह्याचं करावं नाहीतर बुलडाणा जिल्ह्याचं करावं, याला आमची हरकत नाही. सिंदखेडराजा हे ऐतिहासिक ठिकाणं असून त्याचं नाव बदलण्याचा प्रयत्न कोणी करु नये तो केला तर हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू" असंही या रॅलीतील नेत्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णवाहिकेलाही डिझेल नाही! मृतदेह घेऊन जाणारी गाडी मध्यरात्री पंपावर ठप्प, शासनाच्या नियमालाही हरताळ

पुण्यात टोळीयुद्ध थांबेना! वनराजच्या हत्येनंतर २० महिन्यात आंदेकर टोळीनं तिघांना संपवलं, अजून किती बळी जाणार?

Mumbai Goa Highway: काम अर्धवट पण वसुलीत मात्र हायटेक! निकृष्ट व अपूर्ण काम, तरीही मुंबई-गाेवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका सुरू, रायगडकरांचा उद्रेक

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

NEET Paper Leak Exposed: NEET पेपरफुटीचा भांडाफोड करणारे, व्हायरल PDF दाखवणारे शशिकांत सुथार कोण?

SCROLL FOR NEXT