ShivSena: उद्धव ठाकरेंच्या खासदारानेच सांगितलं शिंदेंच्या बंडा मागील कारण, म्हणाले मुलाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Jadhav

ShivSena: उद्धव ठाकरेंच्या खासदारानेच सांगितलं शिंदेंच्या बंडा मागील कारण, म्हणाले मुलाला...

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात वेगळी चूल मांडली. राज्यातील ठाकरे सरकार पाडून राज्यात शिंदे-फडणवीस हे नवं सरकार अस्तित्वात आलं.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत खासदार, जिल्हाप्रमुख अशी अनेक पदाधिकारी गेले. खरी शिवसेना कोणाची हा वाद चालू असतानाच निवडणूक आयोगाने मोठा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला.

आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला दिलं. संपूर्ण पक्ष हातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच सक्रीय झाले.

त्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा नवा प्लान आखला. राज्याच आत्ताच चालू झालेल्या शिवगर्जना मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार लोकांसोबत संवाद साधत आहेत.

आज शिवगर्जना मेळावा हिंगोली औंढा नागनाथ येथे पार पडला यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले खासदार संजय (बंडू) जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे.

शिवगर्जना मेळाव्या दरम्यान ते बोलत होते यावेळी ते म्हणाले, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मुलाला मंत्री करायला नको होत. तुम्ही दोघे मंत्री झाल्यामुळे एकनाथ शिंदेना वाटलं उद्या बाप गेल्यानंतर पोरगं माझ्यावर **बसल.

त्यापेक्षा मीच वेगळी चूल मांडली तर काय बिघडलं या भूमिकेत शिंदे यांनी बंडखोरी केली असं खासदार संजय (बंडू) जाधव म्हणाले. जाधव यांच्या या विधानानंतर ते उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.