Ajit Pawar Girish Mahajan esakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Mahajan : अजितदादा खरंच नाराज? महाजनांनी सांगितलं मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचं 'हे' कारण

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असल्यामुळं मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अनुपस्थित होते.

हेमंत पवार

माझ्यासमोर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं बोलणं झालं होतं.

कराड : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आजारी असल्यामुळं मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आणि दिवसभरातील कार्यक्रमासाठी अनुपस्थित होते. त्यांचे या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणे झाले होते. त्यामुळं ते नाराज आहेत असं म्हणण्यात अर्थ नाही, असं स्पष्ट मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कराड (जि. सातारा) येथे व्यक्त केलं.

मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमास रवाना होण्यासाठी येथील विमानतळावर आले होते. त्यादरम्यान ते बोलत होते. महाजन म्हणाले, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी, दिलीप वळसे-पाटील व अन्य मंत्री उपस्थित होतो. मात्र, त्यांची तब्येत खराब असल्यामुळं उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित नव्हते.

माझ्यासमोर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं बोलणं झालं होतं. काल दिवसभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले. अजितदादांच्या बंगल्यावरील कार्यकमासही ते उपस्थित नव्हते. सध्या अनेकजण यांची युती कशी तुटेल यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यामुळे ते आपापल्या पद्धतीने अर्थ काढत आहेत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.

'आम्ही निवडणुका लांबणीवर टाकत नाही'

निवडणुका लांबणीवर टाकून सरकार निवडणुकांसाठी भीत आहे या प्रश्नावर मंत्री महाजन म्हणाले, 'निवडणुकीसाठी सरकार भीत आहे हे म्हणणे चुकीचे आहे. मात्र, निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करायच्या हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT