'पाय काढायला निघालेत, जनता चिडली तर तुमच्या कमरेला लंगोटही राहणार नाही'; रणजितसिंहांची रामराजेंवर सडकून टीका

माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला जरी हात लागला, तर गाठ माझ्याशी आहे.
Ramraje Naik Nimbalkar vs Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar vs Ranjitsinh Naik Nimbalkaresakal
Summary

‘श्रीराम’ तुम्हाला चालविता न आल्याने तुम्हाला ‘जवाहर’च्या कुबड्या घ्याव्या लागल्या.

फलटण शहर : ज्यांना स्वतः कुठली संस्था काढता आली नाही. बापजाद्यांनी काढलेल्या संस्था दुसऱ्यांना चालवायला दिल्या. तो प्रश्न विचारला म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांचे पाय काढायला निघालेत; पण जनतेने रौद्ररूप धारण केले, तर तुमच्या कमरेला लंगोटही राहणार नाही, अशी टीका खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आमदार रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांच्यावर केली.

‘श्रीराम’पेक्षा जादा दर देणाऱ्या स्वराज कारखान्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असा टोलाही पत्रकार परिषदेत लगावला. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे- पाटील, धनंजय साळुंखे- पाटील आदींसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Ramraje Naik Nimbalkar vs Ranjitsinh Naik Nimbalkar
Jaykumar Gore : माणचा आमदार ठरवणारे रामराजे कोण? सवाल करत भाजप आमदाराची शरद पवारांवरही सडकून टीका

खासदार निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) म्हणाले, ‘‘स्वतःला श्रीमंत समजता व बापजाद्यांनी काढलेल्या संस्था दुसऱ्याला चालवायला दिल्या. श्रीराम सहकारी साखर कारखान्यासंदर्भात प्रश्न विचारला म्हणून माजी प्रशासकीय अधिकारी विश्‍वासराव भोसले यांच्याबाबत पाय काढण्याची भाषा करताय; पण त्यांच्याच काय माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला जरी हात लागला, तर गाठ माझ्याशी आहे.

Ramraje Naik Nimbalkar vs Ranjitsinh Naik Nimbalkar
Samarjeet Ghatge : 'त्या' चुकाच त्यांना सत्तेवरून खाली खेचतील; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर निशाणा

सहकारात राजकारण नको, म्हणून आपण कारखाना, बाजार समिती, दूध संघ व अन्य संस्थांमध्ये हस्तक्षेप केला नाही. निवडणुका लावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. मी नव्याने संस्था उभारल्या आणि त्या हिमतीने चालवून मोठ्या केल्या, याची जाण जनतेला आहे.

Ramraje Naik Nimbalkar vs Ranjitsinh Naik Nimbalkar
CM Siddaramaiah : 'धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा'; मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे शिफारस

‘श्रीराम’ तुम्हाला चालविता न आल्याने तुम्हाला ‘जवाहर’च्या कुबड्या घ्याव्या लागल्या. पंधरा वर्षे त्याचा हिशोब नाही. जमिनी विकल्यात. अजून कर्ज किती राहिले, ते सभासदांना माहिती नाही. अक्षरशः सर्व भोंगळ कारभार सुरू आहे. स्वराज कारखान्यावर बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. कारण ‘श्रीराम’पेक्षा नेहमी एक रुपया जादा दर ‘स्वराज’ने दिला आहे.’’

Ramraje Naik Nimbalkar vs Ranjitsinh Naik Nimbalkar
Chiplun : 'मी उद्धव ठाकरेंसोबतच, पक्षाशी गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही'; सामंतांच्या भेटीनंतर कदमांचं स्पष्टीकरण

रामराजेंना नेमकं खुपतंय काय? असा सवाल करून मालोजी बँक बुलडाणा अर्बनला चालवायला दिली. दूध संघ बंद पाडला. खरेदी-विक्री संघ, साखरवाडी कारखान्याचे वाटोळे केले. बरडला होणारा तासगावकरांचा कारखाना काढू दिला नाही. तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वराज कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्नांबरोबरच रामराजेंनी अनेक राजकीय षडयंत्र केल्याचा आरोपही खासदार निंबाळकर यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com