Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! भाजपमध्ये रात्रीची खलबतं सुरू; देवेंद्र फडणवीसांची रातोरात दिल्ली वारी

रुपेश नामदास

Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणातल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदेंचं सरकार येऊन आता वर्ष होईल तरी देखील अजून पर्यंत दुसऱ्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. पहिला मंत्रिमंडळ विस्तारसुद्धा जवळपास महिना-दीड महिन्याने झाला.

आता राज्यातील सत्तसंघर्षाचा निकाल देखील लागला आहे, त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दौर अटपून तातडीने दिल्ली वारी केल्याची माहिती 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिली आहे.

देवेंद्र फडणवीस अवघ्या काही तासांसाठी नवी दिल्लीला जावून आले त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ते पुन्हा नागपूरात परतले आहेत, फडणवीसांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत हायकमांड सोबत चर्चा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान शिंदे गटातले अनेक माजी मंत्री पुन्हा संधी न मिळाल्याने नाराज आहेत. अनेकजण सातत्याने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत असतात. सध्या मंत्रिमंडळात २० मंत्री आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत.

मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त लवकरच जाहीर होण्याची शक्यता दिसत आहे. शिंदे गटातील नाराज आमदारांपैकी किती आमदारांची नाराजी दूर करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तर काही आमदारांवर विविध महामंडळांची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. जबाबदारीही द्यायची आणि नाराजीही दूर करायची असा दुहेरी नेम शिंदे-फडणवीस या माध्यमातून साधणार का? अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT