Devendra Fadnvis
Devendra Fadnvis sakal
महाराष्ट्र

'उंटाच्या तोंडात जिरे'; व्हॅट कमी केल्यानंतर फडणवीसांची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे असा शब्दप्रयोग करत त्यांनी सरकारला फटकारलं. (Devendra Fadnavis criticizes MVA govt after reducing VAT on fuel)

फडणवीस म्हणाले, "अन्य राज्य सरकारांकडून इंधन दरात 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्यानं दीड आणि 2 रुपये दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असतं."

"इंधन दरकपात करताना केंद्र सरकारनं 2 लाख 20 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के आहे. त्यामुळं इंधन दरकपातीत किमान 10 टक्के भार तर राज्य सरकारनं घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'!," अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.

केंद्रानं कमी केला इंधनावरील अबकारी कर

दरम्यान, शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात करत असल्याची घोषणा केली. यामुळं पेट्रोल ९ रुपये ५० पैशांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झालं. यानंतर केंद्रानं राज्यांनाही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला पाठिंबा देत प्रथम केरळ राज्यानं व्हॅट कमी करत असल्याची घोषणा केली त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारनंही व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं पेट्रोल दरात २ रुपये ८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपया ४४ पैशांनी कपात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT