
साेलापूर: पेनूरजवळ भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार
मोहोळ : तालुक्यातील पेनुर जवळ युनोव्हा व स्कार्पीओ यांचा भीषण अपघात होऊन पती पत्नी डॉक्टरसह त्याची एक मुलगी मयत डॉक्टराच्याच नात्यातीलच अन्य पती पत्नी व त्यांचा मुलगा अशा एकूण सहा जण जागीच मृत झाल्याची घटना ता.22 रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली . याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ येथील मागील तीन पिढयापासुन वैद्यकिय व्यवसायामध्ये असलेल्या खान कुटुंबियातील श्रीमती डॉ. अफरीन खान ( आतार) (वय 30) त्यांचे पती मुजाहीद ईमाम आतार (वय 35 ) मुलगा अरमान मुजाहीद आतार (वय 5 ) ,यांचेसह डॉ. अफरीन खान ( आतार ) यांचे भाऊ नातेवाईक कुंटबिय कौंटुबिक कारणानिमीत्त स्वताच्या सॅलोरा ( गाडी नं M. H. 13 DT 8701 या गाडीने बाहेरगावी गेले होते .
आज रविवार रोजी परत ते आपल्या मोहोळ गावी परत येत असताना पेनुरजवळील माळी पाटीजवळ मोहोळहुन पंढरपूरकडे निघालेल्या स्कॉपीओ ( गाडी नं. M.H.13 .D .E.1242 ) या गाडीने समोरासमोर जोराची धडक दिल्याने कारमधील डॉ. अफरीन खान ( वय 30) त्यांचे पती मुजाहीद आतार त्याचा मुलगा अरमान यांचेसह ईरफान नुरखॉ खान त्यांची पत्नी बेनझीर ईरफान खान मुलगी अनाया ईरफान खान असे सहाजण जागीच ठार झाले . तर इतर चारजण गंभीर जखमी असुन त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे . अनिल हुंडेकरी (वय 35 ) मनीषा मोहोन हुंडेकरी (वय 30 ) रा. गादेगांव ता.पंढरपूर अरहान ईरफान खान ( आतार वय 10 ) रा. मोहोळ आदीजखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे . अपघाताची माहीती पोलीस घेत असुन पुढील कार्यवाही सुरू आहे .
Web Title: 6 Killed In Road Accident Near Penur Three Injured Mohol Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..