devendra fadnavis
devendra fadnavis esakal
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस तातडीने गोव्याला रवाना, निकालाआधीच घडामोडींना वेग

ओमकार वाबळे

येत्या १० मार्चला देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. यामध्ये गोव्यात भाजप सत्ता राखणार कि नाही, या चर्चांना उधाण आलंय. यंदा गोव्यात भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पार्टी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचाही मैदानात आहे. ४० जागांसाठी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्याआधीच भाजपने देवेंद्र फडणवीस यांना गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस यंदा गोव्याचे प्रभारी आहेत. (Devendra Fadnavis in Goa)

गोव्यात भाजपला सत्ता राखण्यात कष्ट घ्यावे लागणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपला सत्ता आणण्यासाठी झगडावं लागलं होतं. यंदा मुख्यमंत्री सावंत यांना खुर्ची कायम ठेवण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागू शकते. सध्या गोव्यात त्रिशंकू सत्ता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांना तत्काळ रवाना करण्यात आलंय.

गोवा राज्यात भाजप-काँग्रेस सत्ता संघर्ष होण्याची शक्यता वाढल्याने फडणवीस गोव्यात निकाल येण्यापूर्वीच जाणार आहेत. मलिक यांच्याविरोधात मोर्चा झाल्यानंतर फडणवीस गोव्याला रवाना होणार आहेत. राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ते सोडून फडणवीस दोन दिवसांसाठी गोव्यात जाणार आहेत. आज संध्याकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गोव्यातील काही पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातून गोवा आणि उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या आमदार आणि कार्यकर्त्यांनाही बैठकीला बोलवण्यात आले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT