
'...तर अजितदादांना फासावर लटकवणार का?', फडणवीसांचा सवाल
मुंबई : आयुक्तांवर शाई फेकल्याच्या आरोपाखाली आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच मुद्द्यावरून आमदार राणा सभागृहात आक्रमक झाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राणांची बाजू लावून धरली. तसेच बेकायदेशीर गुन्हा दाखल करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा: Video: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा साथ साथ
आयुक्तांवर शाई फेकण्याचं समर्थन नाही. अशा व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. पण, दिल्लीमध्ये असणाऱ्या माणसांवर तुम्ही गुन्हा दाखल करता. त्यांचा गुन्ह्यासोबत संबंध नाही. राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांनी गुन्हा केला तर अजितदादांना फासावर लटकवाल का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केला.
आमदार राणांवर गुन्हा दाखल कऱण्यासाठी कोणाचे फोन आले होते? त्यावरून त्या आमदारावर गुन्हा दाखल केला आहे. हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय आपण आमचे संरक्षक आहेत. बेकायदेशीरपणे गुन्हा दाखल केला जात आहे. हे करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. असे झाले नाहीतर पोलिस बेछूट होतील. एकदा पोलिस बेछूट झाले तर या राज्यात काहीच उरणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमदार राणा काय म्हणाले? -
मी दिल्लीत असताना माझ्यावर यासंदर्भातील गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्या आहेत. मी दिल्लीला असताना माझ्या घरात घुसून तपासणी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पोलिसांना फोन करुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी आदेश दिले. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्याचा पुरावाही असल्याचं आमदार राणा म्हणाले.
Web Title: Devendra Fadnavis Question Over Fir Filed Against Mla Ravi Rana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..