Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर शिंदे गटाला गुदगुल्या; संजय शिरसाट म्हणाले...

राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्याने दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यावर लेटर बॉम्ब टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी शिंदे गटाला मात्र गुदगुल्या झाल्याचं बघायला मिळालं.

संतोष कानडे

नागपूरः राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्याने दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यावर लेटर बॉम्ब टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी शिंदे गटाला मात्र गुदगुल्या झाल्याचं बघायला मिळालं. कारण शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या पत्राचं समर्थन केलंय.

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरु झालेलं आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री नवाब मलिक यांनी सभागृहात हजेरी लावली. त्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर आक्षेप घेतले. त्यावेळी फडणवीसांनी बाजू सावरुन घेतली असली तरी नंतर मात्र एक पत्र लिहून अजित पवारांविषयी नाराजी जाहीर केली.

सत्ता येते जाते परंतु सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे, असं म्हणत फडणवीसांनी, नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. नवाब मलिक हे केवळ वैद्यकीय कारणामुळे बाहेर आहेत, वास्तविक त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेणं योग्य ठरणार नाही; असं ट्वीट फडणवीसांनी केलं.

या सगळ्या प्रकारानंतर अजित पवारांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसली तरी शिवसेनेने (शिंदे गट) प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका योग्य आहे. या पत्रामुळे सरकारला कोणताही धोका नाहीये. ज्यांचे दाऊदशी संबंध आहेत, त्यांना सोबत घेणे योग्य ठरणार नाही.

शिरसाट पुढे म्हणाले, तुमचं राजकारण जाती-धर्माचं असेल तर त्याला लखलाभ.. परंतु त्यांना आमच्याबरोबर का घ्यायचं? जो देशाच्या विरोधात जाईल, त्यांच्या विरोधात राहाणं, ही आमची भूमिका आहे; असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. फडणवीसांच्या पत्राचं समर्थन त्यांच्याकडून करण्यात आलंय.

दरम्यान, गुरुवारी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसलेले दिसले. नवाब मलिक यांनी अद्यापही कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. जामिनावर बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र गुरुवारी आसन व्यवस्थेवरुन ते अजित पवारांच्या सोबत आहेत, असं दिसून आलेलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT