Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: "हाच फरक माझ्यात अन् शरद पवार यांच्यात...."; फडणविसांच्या CM पदावरून पवारांना प्रतिटोला

Sandip Kapde

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येणार', या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ज्याला पुन्हा यायचं आहे, तो व्हिडीओ टाकून येणार का?, असा प्रश्न उपस्थित केला. एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार. यणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले होते, "मी त्या व्हिडिओला गांभीर्याने घेत नाही. फडणवीस यांच्याकडे ११० आमदार आहेत. त्यांना नजरअंदाज करता येणार नाही. माझ्याकडे ११० आमदार असते तर मी सरकार बनविले असते."

यावर फडणवीस म्हणाले, "हाच फरक शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे. मी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहणार आहे. एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धसका घेतला त्यामुळे माझ्यावर आरोप केले. असे शरद पवार म्हणाले होते. यावर देखील फडणवीसांनी टोला लगावला.

फडणवीस म्हणाले, "ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात. त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली चार खासदार निवडून येतात त्यांचा कसा धसका घेतला, असे म्हणणे म्हणजे हास्यास्पद ठरेल. पवार काय बोलले हे मी ऐकलं नाही त्यांच्यामुळे मी काही बोलणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT