Maratha Reservation : आरक्षण मागणीसाठी टायर पेटवून चक्का जाम आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले
burning tires for maratha reservation manoj jarange again protest politics
burning tires for maratha reservation manoj jarange again protest politicssakal
Updated on

कळंब : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून शहरातील ढोकी रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौक,ढोकी रस्तात्यावरवरील तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) आणि कळंब ते येरमाळा रत्यावर चक्का जाम आंदोलन शनिवार (ता.२८) सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

यामुळे या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती.तसेच कळंब शहरात राजकीय नेत्यांना शहर बंदीचे फलक लावण्यात आले असून एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांना शहरात पाय ठेवू देणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. सरकार याकडे लक्ष देत नसल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. जरांगे यांच्या उपोषणाला सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा म्हणून कळंब शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक,

ढोकी रस्त्यावरील पिंपळगाव (डोळा),कळंब ते येरमाळा रस्त्यावर टायर पेटवून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा अन्यथा यापेक्षा ही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र होत चालला आहे.

गावोगावी नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.चक्का जाम आंदोलनामुळे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.तर काही काळ एसटी बसेसच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.यापूर्वी कँडल मार्च,आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचे फलक जाळले होते.रास्तारोको आंदोलन वेळी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या.आरक्षण मागणीसाठी तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maratha Quota Protest Case in Jalna: 39 Cases Dropped, 10 Still Pending in Court
Devendra Fadnavis Stresses Holistic Maratha Empowerment
Maratha Reservation Row: Government Pushes Back in Court, Backs Shukre Panel Findings
Promise Delivered: Families of Deceased Agitators to Get Employment in MIDC Units
Marathi News Esakal
www.esakal.com