Devendra Fadnavis On Aaditya Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis News : ''त्यांनी डोळ्याला पट्टी लावली आहे'' आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis On Aaditya Thackeray: कोकणी माणसावर एवढा राग कशा साठी? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली होती

राहुल शेळके

Devendra Fadnavis On Aaditya Thackeray: बारसू रिफायनरीत गुंतवणूक करणारी सौदी आराम्को ही कंपनी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करीत असल्याच्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुजोरा दिला.

बारसू रिफायनरीला उशीर केल्यामुळे सरकारी कंपन्यांबरोबर जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार असून, पाकिस्तानला तिचा फायदा होणार आहे.

तसेच बारसू प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला पुढील 20 वर्षे चालना मिळणार असल्याने आपल्या सरकारी कंपन्या ही रिफायनरी तयार करतील, अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी काल दिली.

यावर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर टीका केली आहे. ट्वीट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “नाणार असो की बारसू असो… भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे, हे वारंवार दिसतंच. त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी?”

“‘पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग’ अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहत आहेत. उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील…

स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील! कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली.

नाशिकमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “किमान आदित्य ठाकरे अभ्यास करून किंवा भाषण ऐकून बोलतील, असं मला वाटत होते.

पण, आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधलीय आणि विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय?” अशी टीका फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT