Devendra Fadnavis says Eknath Shinde accepted the mistake maharashtra politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: '...अन् ती चुक एकनाथ शिंदेंनी दुसऱ्याच दिवशी मान्य केली'

देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा

धनश्री ओतारी

आतापर्यंत 'देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' अशी जाहिरात पाहयला मिळाली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी या स्लोगनमध्ये बदल करुन 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. त्यामुळे शिंदे फडणवीस यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चेला उधाण आलं. दरम्यान, जाहिरातीत बदल करत पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, या मुद्यावर पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस भाष्य केलं. (Devendra Fadnavis says Eknath Shinde accepted the mistake maharashtra politics)

रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. ही जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि चूक मान्य केली. आमच्या काही लोकांनी चूक केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले, अशी माहिती स्वत: देवेंद्र फडणवीसांनी दिली.

काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीमुळे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वादाची ठिणगी पडली होती. शिंदे गटाने राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर एक जाहिरात दिली होती. ज्यामध्ये “राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” अशा प्रकारचा संदेश दिला होती. इतकचं नव्हे तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, असा संदेशही एका सर्वेक्षणाच्या आधारे दिला होता.

काय म्हणावे फडणवीस?

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ती जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत: माझ्याशी संवाद साधला. ती जाहिरात चुकीची छापली गेली, असं ते म्हणाले. आमच्या लोकांनी चूक केली केली, असंही त्यांनी मान्य केलं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे आणि माझ्यात ज्याप्रकारचं घट्ट संबंध आहेत, ते कदाचितच युतीच्या सरकारमध्ये दिसतात.

कारण मी कधीही एकनाथ शिंदे यांचा मान, सन्मान आणि शिष्टाचार मोडत नाही आणि तेही मी उपमुख्यमंत्री आहे, याची जाणीव मला कधीच होऊ देत नाहीत. आम्ही दोघांनी एक मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे आम्ही पुढे जात आहोत.

काही वेळा पार्टीत कमी बुद्धीचे लोक असतात, ते चुकीचं काम करतात. पण एवढ्या छोट्या चुकीसाठी आमच्यात मतभेद होतील किंवा सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल तर ते कधीही होऊ शकत नाही. आम्ही एका मोठ्या विचाराने आणि ध्येयाने हे सरकार स्थापन केलं आहे,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Statement : २०२४ साली काँग्रेसचे ७५ तर महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडूण आले असते; आयबीच्या रिपोर्टमध्ये उल्लेख, नाना पटोलेंचा दावा

MS Dhoni's advice to the Gen Z : युवा पिढीला तू काय सल्ला देशील? महेंद्रसिंग धोनीचा Video पाहायला हवा; म्हणाला, विनंती करतो...

शरद पौर्णिमेची रात्र का मानली जाते विशेष? लक्ष्मीपूजा ते चंद्रदर्शनापर्यंत; वाचा नियम आणि चंद्र दोष निवारणाचे सोपे उपाय!

Gokul Milk Union Election : गोकुळमध्ये निवडूण आलेले महायुतीचे संचालक गावातच राहणार; अध्यक्ष निवडीत दगाफटका होणार का?, संचालकांकडून स्पष्टीकरण

MS Dhoni on IPL 2027 : पुढे खेळायचं की नाही, डिसेंबरमध्ये निर्णय घेणार; महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केलं चित्र, तेव्हा असं नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT