Devendra Fadnavis and Sunil Kendrekar  
महाराष्ट्र बातम्या

शेतकरी आत्महत्यांबद्दल केंद्रेकरांनी सादर केलेल्या अहवालावर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले...

रवींद्र देशमुख

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी हजारो कोटींच्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाबाबत मोठं विधान केलं आहे.

फडणवीस म्हणाले की, मी देखील केंद्रेकर यांचा अहवाल पाहिला. त्यांची समिती अधिकृत नव्हती. त्यांनी चांगल काम केलं. त्यांची शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठीची जी काही मतं आहेत, त्याचा आम्ही नक्की विचार करणार आहोत. आता ज्याकाही उपायोजना मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्या, त्या शेतकरी आत्महत्या रोखण्याशी संबंधीतच आहे. दुधाळ जनावरे देणं ही उपायोजना आहे. मराठवाड्यातील सर्व गावं त्यात समाविष्ट करत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

मराठवाडा हा दुष्काळग्रस्त असून शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रेकरांनी तब्बल १०४ प्रश्नांचा समावेश असलेला अर्ज तयार करून सर्वे केला होता. १० लाख शेतकऱ्यांचा अभ्यास केल्याचं सांगण्यात येतं.

स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याच्या दोन दिवस आधी केंद्रेकर यांनी अहवाल सरकारला सादर केला होता. सर्व्हेतील वर्गवारीनूसार १ लाखाहून अधिक शेतकरी आत्महत्येच्या विचारात आहेत. तर तब्बल तीन लाख शेतकऱ्यांना देखील अहवालाच्या संवेदनशील यादीत दाखवण्यात आलं होतं. तसेच पेरणीसाठी काढावे लागणारे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न, शेतमालाचे नुकसान या सगळ्याच गोष्टी शेतकरी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT