Money Fraud sakal media
महाराष्ट्र बातम्या

धुळ्याचा माला'माल' LIC किंग कंगाल; तिसऱ्या दिवशी 10 कोटींची संपत्ती जप्त

धुळे शहरात दोन दिवसांपूर्वी एका सावकारावर आर्थिक गुन्हे शाखा आणि पाच विशेष पथकाने धाड टाकली होती.

दत्ता लवांडे

धुळे : धुळे शहरात दोन दिवसांपूर्वी एका सावकारावर आर्थिक गुन्हे शाखा आणि पाच विशेष पथकाने धाड टाकली होती. त्यानंतर त्याच्याकडे पहिल्या दिवशी सव्वा कोटी रुपयांची रोख रक्कम आणि काही सोन्याचे दागिने सापडले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 कोटी तर तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडून 10 कोटी 72 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

धुळे शहरातील एलआयसी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावकार राजेंद्र बंब यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला होता. त्यांची शहरात एलआयसी किंग म्हणून त्याची ओळख आहे. छाप्यामध्ये पोलिसांना त्याच्याकडे विदेशी चलनातील नोटा सापडल्या आहेत. दरम्यान त्याचे बॅंकेतील लॉकर तपासले असता त्याच्याकडे 10 कोटी 72 लाखांचं घबाड सापडलं आहे.

सलग तीन दिवस संपत्ती हाती लागत असून पोलिसही चक्रावून गेले आहेत. अद्यापही हाती लागलेल्या संपत्तीची मोजणी सुरू आहे. तिसऱ्या दिवशी 5 कोटी 13 लाखांची रोख रक्कम, 10 किलो 563 ग्रॅम सोने सापडले असून त्याची किंमत 5 कोटी 54 लाख एवढी किंमत आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी सावकार राजेंद्र बंब यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकली होती. त्यामध्ये त्यांच्याकडून १ कोटी रूपयांचा मुद्देमाल आणि महत्त्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशीही छापा टाकून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला होता. त्यामध्ये सोन्याचे बिस्किट सापडले होते. सलग तिसऱ्या दिवशी टाकलेल्या छाप्यात पोलिसांना तब्बल साडेदहा किलो सोने मिळून एकूण १० कोटी ७२ लाखांची रोख रक्कम सापडली होती. हा सर्व मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT