death penalty to accused in pune triple murder case
death penalty to accused in pune triple murder case Sakal
महाराष्ट्र

जुहू बलात्कार प्रकरण; आरोपी गुडाप्पा देवेंद्र याला फाशीची शिक्षा

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने गुडाप्पा चिन्नाटंबी देवेंद्र याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याने एप्रिल 2019 मध्ये जुहू परिसरातील एका 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा मृतदेह गटारात फेकला होता. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

(Death Penalty For Rape Case )

एप्रिल 2019 मध्ये 9 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गुडाप्पा चिन्नाटंबी देवेंद्र या आरोपीला दिंडोशी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण यानंतर आरोपी उच्च न्यायालयात अपील करू शकणार आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी दिंडोशी न्यायालयाने साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान जुहू परिसरात एका नऊ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिचा बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवस मुलगी बेपत्ता होती. तिच्या पालकांनी अपहरणाची तक्रार नोंदवली होती पण तपासादरम्यान तिचा मृतदेह आढळून आला होता. शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह नेहरूनगरमधील श्रीलंका चाळीच्या शौचालयात आढळला. तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले होते. त्यानंतर तपासात आरोपी गुडाप्पा चिन्नाटंबी देवेंद्र याला अटक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT