AS
महाराष्ट्र बातम्या

पुन्हा ई-पास! दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पासची यंत्रणा लागू

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना महत्वाच्या कारणांसाठी आंतरजिल्हा किंवा परराज्यात प्रवास करण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे ई-पास मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबरच नागरिकांना स्थानिक पोलिस ठाण्यातूनही पास उपलब्ध होणार असल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र नागरिकांना हे ई-पास केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठीच मिळू शकणार आहेत. ज्या नागरिकांना ई-पासची आवश्‍यकता आहे, अशा नागरिकांना ई-पाससाठी covid19.mhpolice.in या लिंकवर अर्ज करावा लागणार आहे.

अशी आहेत ई-पास मिळविण्यासाठीची प्रक्रिया

  • - अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्यांना प्रवासासाठी आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य प्रवासासाठी प्रवास पासची गरज नाही

  • - पास मंजूर करणे किंवा नाकारण्याचा अधिकार पोलिस अधिक्षक किंवा शहरातील पोलिस उपायुक्तांना असणार आहे.

  • - अन्य सर्व वैयक्तीक व समुहांना या पद्धतीनुसार पास उपलब्ध होऊ शकतील.

  • - अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबी व्यवस्थित भरुन द्या

  • - अर्जासोबत जोडण्यासाठीची कागदपत्रे लिंकवर अपलोड करताना एकाच फाईलमध्ये एकत्र करा.

  • - अर्जासोबत जोडण्यासाठीच्या फोटोचा आकार हा 200 केबी व कागदपत्रांचा आकार हा 1 एमबी पेक्षा जास्त असू नये.

  • - संबंधित विभागाकडून पडताळणी व मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता

  • - संबंधीत विभागाकडून तुमचा अर्ज मंजुर झाल्यानंतर टोकन क्रमांक टाकून तुमचा ई-पास प्राप्त करून घ्या

  • - ई-पासमध्ये आपले तपशील, वाहन क्रमांक, वैधता आणि एक क्‍यूआर कोड असेल.

  • - संबंधीत ई-पासची एक प्रत तुमच्याजवळ ठेवा, त्याचबरोबर मोबाईलमध्येही त्याची "सॉफ्ट कॉपी' असू द्या. पोलिसांकडून विचारणा झाल्यानंतर पास दाखवा

  • - ई-पासचा गैरवापर करणे, मुदत संपल्यानंतरही वापर करणे किंवा विनापरवानगी पास वापरणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो, त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.

ई-पाससाठीची आपत्कालीन कारणे

  • - अत्यावश्‍यक सेवा

  • - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती

  • - मृत्यु झालेल्या व्यक्तीचे प्रथम नातेवाईक

  • - तत्काळ वैद्यकीय उपचार

  • - लग्न

  • - अन्य

पोलिस महासंचालक कार्यालयाने ई-पाससाठी covid19.mhpolice.in ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. पुणे शहरातील नागरिकांनाही आपत्कालीन कारणासाठी आंतरजिल्हा किंवा परराज्यातील प्रवासासाठी लागणारे ई-पास संबंधीत लिंकवर उपलब्ध होतील.''

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: अभिषेक शर्माला टीम इंडियातून डच्चू? भारताच्या प्रशिक्षकांनी स्पष्टच उत्तर दिलं, 'त्याच्याबद्दलची चर्चा...'

Latest Marathi News Live Update : उजनी धरण पंचवीस दिवसात शंभरीवरून 75 टक्क्यावर

Leopard Found Dead in Satara : साताऱ्यात उसाच्या फडात काय होतं? पाचटीत सडलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह; बळी गेला की घातपात?

HSC Science paper leak : बारावी सायन्स फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा

Bagalkot Shivaji Jayanti Violence : बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक; तीन पोलिस जखमी, मुख्य आरोपी तंजीरसह आठ जण अटकेत

SCROLL FOR NEXT