esakal | 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस; आंध्र प्रदेशचा कौतुकास्पद निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस; आंध्र प्रदेशचा कौतुकास्पद निर्णय

18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस; आंध्र प्रदेशचा कौतुकास्पद निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

विशाखापट्टनम : देशात सध्या कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. काल गुरुवारी (ता.२२) देशात तब्बल ३ लाख ३२ हजार ७३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून गेल्या २४ तासात २ हजार २६३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. आणि आता यासंदर्भातच आंध्र प्रदेश राज्याने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी वय वर्षे 18 च्या वरील राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे.

अशी करा नोंदणी

1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर्ससोबत बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोरोना लस मोफत असेल, तर खासगी हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला यासाठी काही किंमत मोजावी लागेल. लस घेण्यासाठी CoWIN ऍपवर रेजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

  • - सर्वात प्रथम cowin.gov.in या वेबसाईटला भेट द्या

  • - येथे आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर भरा

  • - तुम्हाला ओटीपी मोबाईलवर मिळेल, नंबर टाकून रेजिस्ट्रेशन करा

  • -रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लसीकरणासाठी दिवस आणि वेळ ठरवू शकता

  • - हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही लस घेऊ शकता.

  • -यावेळी तुम्हाली रेफ्रन्स आयडी मिळेल, याच्या माध्यमातून तुम्हाला लस सर्टिफिकेट मिळू शकते.

गुरुवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येचा कहर

काल देशात तब्बल ३ लाख ३२ हजार ७३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी दिवसभरात १ लाख ९३ हजार २७९ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत भारतातील १ कोटी ६२ लाख ६३ हजार ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून १ कोटी ३६ लाख ४८ हजार १५९ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी झालेल्या मृतांची संख्या पाहता लवकरच दोन लाखाचा टप्पाही ओलांडला जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ८६ हजार ९२० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

loading image