Dasara Melava Ekanath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: 'तुम्ही तर तुमच्या बापालाच विकण्याचा केला प्रयत्न...' एकनाथ शिंदे बेभान!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्याच्या निमित्तानं बीकेसीमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्याच्या निमित्तानं बीकेसीमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. यावेळी शिंदे यांचा आक्रमकपणा दिसून आला आहे. त्यांनी परखडपणे आजवर आपल्यासोबत झालेल्या अन्याय, अत्याचाराचा पाढा वाचून दाखवला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली आहे. शिंदे यांनी दरवेळी आम्हाला गद्दार म्हणून का डिवचले जाते. आम्ही गद्दार नाही तर गदर करणारे आहोत. जे आमच्यावर टीका करत आहेत त्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे खरे वारसदार होणं म्हणजे विचारांचे वारसदार होणे, आम्ही तो जपला आहे. आम्हाला गद्दार म्हटलं जातं. याशिवाय दुसरं काही बोलायला नाही. गद्दारी झाली पण ती 2019 ला झाली. त्या निवडणूका झाल्या त्यानंतर जी आघाडी झाली त्यात गद्दारी झाली. हिंदूत्वाच्या विचारांसोबत गद्दारी झाली.

बाळासाहेबांचा फोटो आणि दुसऱ्या बाजुला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आम्ही लावला होता. आम्ही केलेली गद्दारी नाही तर हा गदर आहे. ही क्रांती आहे. तुम्ही बापाचे विचार विकले. तुम्ही तर बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. सत्तेसाठी तुम्ही हिंदूत्वाला तिलांजली दिली. बघा काय हा जनसागर आहे. किती यांच्यात उत्साह आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोंढे आहे. मी कुणावर टीका करणार नाही. आमचे विचार बदलले नाहीत. तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात. 25 वर्षे आम्ही सडलो...

याकुब मेननचं स्मारक तुम्ही तयार केले....मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले. कुणी केली गद्दारी....ती तुम्ही केली....आम्ही नाही तुम्ही गद्दार आहात....आतापर्यत राज ठाकरे, नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. यामागील कारण काय याचा विचार करा. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायची होती म्हणून तुम्ही शिवसेनेचे पानिपत होऊन दिले. आम्ही जो निर्णय घेतला त्यात आम्हाला फार आनंद झाला असे नाही. गेल्या अडीच वर्षांपासूनची जी खदखद होती ती बाहेर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT