Uday Samant News esakal
महाराष्ट्र बातम्या

Uday Samant:''भाकरीमध्ये वाटेकरी झाले पण... शिंदेंच्याच हातात खातेवाटप'', उदय सामंतांनी उद्भवलेल्या परिस्थितीवर दिलं स्पष्टीकरण

संतोष कानडे

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे राजीनामा देणार, शिंदेंचे दोन आमदार भीडले, शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात... या सगळ्या वृत्तांच्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी भाकरीमध्ये वाटेकरी झाल्याचं विधान केलं होतं त्याचंही उत्तर सामंतांनी दिलं.

काय म्हणाले होते गोगावले?

मंगळवारी, ४ जुलै रोजी बोलतांना गोगावले म्हणाले होते की, नाराज होऊन आता काय करणार. जी वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारली पाहिजे आणि तिला सामोरे गेले पाहिजे, त्यामुळे आता नाराज होऊन काय चालणार नाही.

थोडीफार नाराजी प्रत्येकांची राहणारच आहे. कारण, ज्याला एक भाकरी खायची होती, आता अर्धी मिळाली आहे आणि ज्याला अर्धी खायची होती, त्याला पाव मिळणार आहे. राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर ते सर्व स्वीकारून पुढे चालायला पाहिजे, अशा शब्दांत अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागाबाबत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी हतबलता व्यक्त केली होती.

आज उदय सामंत बोलतांना म्हणाले की, भाकरीमध्ये वाटेकरी झाले, जी भाकर पूर्ण खाणार होतोत ती कमी वाट्याला येणार आहे. काही मंत्रिपदं इकडे-तिकडे होतील, असं गोगावलेंना म्हणायचं होतं. कुठेही नारीजी नाहीये. एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार नाहीत किंवा आमचे आमदार कुणाच्याही संपर्कात नाहीत. या सगळ्या अफवा पसरवल्या जात असल्याचं सामंतांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले उदय सामंत?

  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ही बातमी चुकीची आहे.

  • आम्ही राजीनामा देणारे नव्हे तर घेणारे लोक आहोत

  • ज्या पक्षातून उठाव झाला तिथे परत जाण्याचा प्रश्न नाही

  • राष्ट्रवादीमुळे आम्ही नाराज नाहीत

  • एकनाथ शिंदेंची बदनामी, त्यांच्यावर टीका आणि सरकार पडण्याची तारीख द्यायची; असेच प्रकार घडले

  • देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी वारंवार सांगितलं की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका होतील

  • दोन आमदारांमध्ये भांडण झालेलं नाही. जे घडलेलंच नाही ते घडल्याचं सांगितलं जात आहे

  • एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एकमेकांचा सन्मान ठेवला जाईल

  • खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, ते ठरवतील

  • तिनही नेत्यांना प्रत्येक मतदारसंघांची जाण आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT