Shivsena MLA : एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली; 10 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात?

Eknath Shinde - Uddhav Thackeray
Eknath Shinde - Uddhav ThackerayEsakal

मुंबईः अजित पवारांच्या बंडाने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. परंतु या भूकंपाचे हादरे एवढ्यावच थांबणार नाहीत. तर आणखीही मोठ-मोठे धक्का महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.

latest marathi news

ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राऊत म्हणाले की, ८ ते १० आमदार आमच्या संपर्कात आहेत. ज्यांना मंत्रिपदं मिळालेली नाहीत असे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातले आमदार आमच्या संपर्कात आहेत.

marathi tajya batmya

Eknath Shinde - Uddhav Thackeray
NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

''जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं आम्ही सांगणार नाहीत. परंतु त्यांनी मंत्रिपदाचे कपडे शिवले होते, ते संपर्कात आहेत. कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर काही आमदार धावून गेल्याचं मी ऐकलं आहे. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेंच्या वाट्याला केवळ दोन ते तीन मंत्रिपदं मिळतील'' असाही दावा विनायक राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे मागचं सगळं विसरुन गेलेले आहेत, ते आम्हांला माफ करतील, असं म्हणत आमदार 'मातोश्री'च्या संपर्कात असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या नाराजीमुळे गडचिरोली दौरा रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे. पक्षामध्ये बंडाळी उफाळून येऊ नये म्हणून एकनाथ शिंदे प्रयत्न करीत आहेत.

Eknath Shinde - Uddhav Thackeray
Sidhi Pee Case : लघुशंका प्रकरणातील पीडित आदिवासी तरुणाचे मुख्यमंत्र्यांनी धुतले पाय; निवासस्थानी बोलवून केला सन्मान!

अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्यात एक बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा शब्द देऊन आमदारांच्या नाराजीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करु, असं म्हटलं होतं. त्यावरुन शिंदेंच्या शिवसेनेत काहीतरी सुरुय, हे दिसून येतंय.

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, संजय शिरसाट आणि मंत्री संदीपान भूमरे यांनी कालच्या बैठकीत आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com