Shinde-Fadanvis Government & Mahavikas Aghadi maharashtra political News esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार? प्रशासनाला महत्त्वपूर्ण आदेश प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी लोकसभा आणि अनेक राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा आणि महाराष्ट्रातील निवडणुका एकत्र होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणुकीचे काम वेळापत्रकानुसार होणे आवश्यक असल्याने उपजिल्हा निवडणूक अधिकारी व त्यांच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीव्यतिरिक्त कोणतेही काम दिले जाऊ नये, असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना आदेश जारी केला आहे. त्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाशिवाय अन्य जबाबदारी न देण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी अधिकाऱ्यांनी मतदारसंघातील स्थितीचे अहवाल तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०२४ मध्ये संपणार आहे. तसेच लोकसभेची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र तसेच हरियानातील विधानसभा विसर्जित करून दोन्ही राज्यांच्या निवडणुका लोकसभेबरोबर होण्याची शक्यता आहे.

चर्चांना उधाण

राज्यातील विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्वतयारी, संचलन, मतदान यंत्रांची तपासणी आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही अतिरिक्त जबाबदारी न देण्याच्या सूचना केल्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Nursing COllege : बारामतीतील नर्सिंग महाविद्यालयासाठी 55 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता....

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

SCROLL FOR NEXT