Maharashtra Sadan : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील त्या घटनेवर CM शिंदे अखेर बोललेच, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

(CM Eknath Shinde On Statue Of Ahilyabai Holkar And Savitribai Removed From Maharashtra Sadan In Delhi )

Maharashtra Sadan : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील त्या घटनेवर CM शिंदे अखेर बोललेच, म्हणाले...

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तात्पुरते हटवण्यात आलं. याच गोष्टीवरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना रात्री उशीरा माध्यमांशी संवाद साधताना या घटनेवर स्पष्टीकरण दिलं. (CM Eknath Shinde On Statue Of Ahilyabai Holkar And Savitribai Removed From Maharashtra Sadan In Delhi )

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमीत्त महाराष्ट्र सदन सजवण्यात आलं होतं. यावेळी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तात्पुरते हटवण्यात आल्याची बाब महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. तसंच, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.

दरम्यान, दिल्लीतून रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

“सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आमच्यासाठी पूजनीय आणि आदरनीय आहेत. त्यांच्याविषयीचा आदर प्रत्येक देशवासीयांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांचा अनादर होणार नाही. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असून ते याबाबतचा खुलासा करणार आहेत. शेवटी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले हे आमच्यासाठी फार आदरास्थानी आहेत.” अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

हे प्रकरण संवेदनशील...

या प्रकरणाची माहिती घेतली पाहिजे. हे प्रकरण संवेदनशील आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सर्वांबद्दल आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे या प्रकरणी माहिती घेऊन बोलणं योग्य ठरेल. अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.