Mega Recruitment sakal
महाराष्ट्र बातम्या

ZP Recruitment News : जि. प. नोकरभरतीसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा; जाणून घ्या संभाव्य वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP Recruitment : जिल्हा परिषदेतील रिक्त जागांच्या नोकरभरतीसाठी प्रक्रिया सुरू आहे. एक हजार ३८ जागांसाठी ६४ हजार ८० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. नोकरभरतीसाठी ३ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षेला सुरवात होईल.

त्यासाठी आयबीपीएस कंपनीने तयारी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विविध संवर्गांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एक अथवा तीन शिफ्टमध्ये परीक्षा होईल, अशी माहिती देण्यात आली.

राज्य शासनाकडे ओरड झाल्यावर जिल्हा परिषदेतील विविध रिक्त पदांसाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेस सुरवात झाली. (Exam for zp recruitment from 3rd October news)

यात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात आले होते. त्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांकडून एक हजार, मागासवर्गीय उमेदवारांकडून ९०० रुपये आकारण्यात आले होते.

२० संवर्गांसाठी तब्बल ६४ हजार ८० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज दाखल केल्यावर परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. अखेर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्व जिल्हा परिषदांतील परीक्षा एकाच वेळी होतील.

पहिल्या टप्प्यात कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी, लघुलेखक, कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांसाठी ३ ते १९ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा होणार आहे. ग्रामसेवक, आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या परीक्षा दुसऱ्या टप्प्यात होतील.

नोकरभरतीमधील अनेक पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. कनिष्ठ सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षक या पदांबाबतचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. आरोग्य विभाग आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या मोठी आहे.

संभाव्य वेळापत्रक

३ ऑक्टोबर : सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंतापासून ऑनलाइन लेखी परीक्षेला सुरवात

४ ऑक्टोबर : तांत्रिक पदासाठी परीक्षा

५ ऑक्टोबर : पशुधन पर्यवेक्षक

७ ऑक्टोबर : वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

८ ऑक्टोबर : विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

१० ऑक्टोबर : विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक

११ ऑक्टोबर : स्टेनोग्राफर व कनिष्ठ सहाय्यक लेखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT