elgar parishad 2021 sharjeel usmani controversial statement Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

शरजील उस्मानीवर आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी गुन्हा दाखल

हिंदू जनजागरण मंचाकडून जालन्यात तक्रार दाखल

Amit Ujagare (अमित उजागरे)

जालना : अलिगड मुस्लीम विद्यापीठातील (Aligarh Muslim University) विद्यार्थी नेता आणि पुण्यातील दुसऱ्या एल्गार परिषदेतील (Elgar Parishad) कथीत वादग्रस्त विधानप्रकरणी चर्चेत आलेला शरजील उस्मानी (Sharjeel Usmani) आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्यावर आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी जालन्यात (Jalna) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR filed on Aligarh Mushlim University Student leader Shrjeel Usmani in Jalana for objectinable Tweets)

पोलिसांच्या माहितीनुसार, अंबड येथील हिंदू जागरण मंचचे अंबादास अंभोरे यांनी शरजीलविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत अंभोरे यांनी आरोप केला आहे की, "शरजीलनं नुकतचं त्याच्या ट्विटमध्ये प्रभू रामाबद्दल अनादर होईल असा शब्दप्रयोग केला आहे. यामुळे हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत."

अंबड पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी रात्री शरजील उस्मानीविरोधात गुन्हा दाखल केला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जालन्याच्या सायबर विभागाकडे हे प्रकरणी हस्तांतरीत करण्यात आलं आहे.

यावर्षाच्या सुरुवातीला पुणे पोलिसांनी शरजील उस्मानीविरोधात चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ३० जानेवारी रोजी पुण्यात पार पडलेल्या दुसऱ्या एल्गार परिषदेत त्यांनी हे विधान केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT