women workers die boat capsize gadhavi river sakal
महाराष्ट्र बातम्या

Gadchiroli Boad Capsized: गडचिरोलीत मजुरीवर निघालेल्या महिलांची नाव नदीत उलटली; ६ जणींना जलसमाधी

गडचिरोलीतील चार्मोशी तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

गडचिरोली : मजुरीवर निघालेल्या महिलांची नाव नदीत उलटल्यानं त्यात ६ जणींनी जलसमाधी मिळाल्याची घटना घडली आहे. गडचिरोलीतील चार्मोशी तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीतून जात असताना ही घटना घडली आहे. यातील एका महिलेला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. (Gadchiroli Boad Capsized 6 women labor drown in vainganga river)

या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. चार्मोशीतील गणपूर गावाजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही दुर्घटना घडली. या महिला मिरची तोडणीसाठी निघाल्या होत्या. एकूण सहा जणी या नदीतून पलिकडं निघाल्या होत्या त्यांच्यासोबत नावाडी सुद्धा होता.

पण नाव उलटल्यानंतर नावाडी पोहून नदीबाहेर आला. त्यानं एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्नही केला पण तो तिला वाचवू शकला नाही. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरली. त्यानंतर लोकांनी तिकडं गर्दी केली.

गणपूरवरुन चंद्रपूरला जाण्यासाठी रस्ते आणि वाहनांची व्यवस्थीत सोय नसल्यानं इथं ग्रामस्थांना नदीतून नावेच्या माध्यमातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. आता या घटनेनंतर तरी इथं प्रशासनाकडून दळणवळणाचा गांभीर्यानं विचार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT