Gautami Patil  
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil : गौतमी पाटील व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मोठी अपडेट; आरोपींविरोधात...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका २६ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार तरुणी गौतमी पाटील यांच्या सहकारी आहेत. दरम्यान, पाटील यांचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ गुपचूप काढण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ गौतमी पाटील यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्रामवर खाते काढून अपलोड करण्यात आला. तसेच, तो व्हायरल केला गेला. अज्ञाताने इन्स्टाग्रामसोबत व्हाट्सअपवर देखील तो व्हिडिओ टाकून प्रसारित केला.

हा प्रकार पाटील यांच्या सहकारी तक्रारदार यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी त्वरित विमानतळ पोलिसांकडे धाव घेतली. घटनेची माहिती देऊन तक्रार दिली. दरम्यान, तक्रारदार तरुणी व त्यांच्या सहकाऱ्यांना संबंधिताने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी यानुसार या खाते धारकांवर गुन्हा नोंद केला आहे. गौतमी पाटील हिच्या नावाने दोन खाते व एका तरुणाच्या नावाने एक खाते अशा तीन खाते धारकांविरोधात गुन्हा नोंद केला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story: मेहनतीच्या बळावर तिन्ही मुले डॉक्टर; एकाची एमबीबीएस तर दोघांची पदव्युत्तरला एंट्री, वडिलांनी स्वत: केला स्वयंपाक!

Viral Video: 'डोगेश भाई' ने आयआयटी मुंबईच्या क्लास रुममध्ये लावली हजेरी, श्वानाच्या व्हायरल व्हिडिओने घातला धुमाकूळ

Central Railway: चाकरमान्यांना दिलासा! होळी, उन्हाळी सुट्टीसाठी विशेष रेल्वे, १००हून अधिक गाड्यांचे आयोजन; पाहा वेळापत्रक

Post Office Scheme: या सरकारी योजनेत पैसे दुप्पट! FD पेक्षा कशी वेगळी? कोण करू शकतो गुंतवणूक? जाणून घ्या सर्व माहिती

Pune News: सकाळ + स्टडीरूमच्या ‘ग्रेट भेट’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांचा दिशादर्शक संवाद

SCROLL FOR NEXT