graduate constituency election Balasaheb Thorat support to Satyajit Tambe  
महाराष्ट्र बातम्या

Satyajit Tambe: सत्यजीत तांबेंना बाळासाहेब थोरातांचा पाठिंबा? पोस्टरमुळे चर्चेला उधाण

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अगदी मतमोजणीच्या दिवशीही नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अगदी मतमोजणीच्या दिवशीही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आज मतमोजणी असल्याने कालपासून सत्यजित तांबेचं विजयी होणार असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अशातच दुसरीकडे सत्यजीत तांबेंना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. (graduate constituency election Balasaheb Thorat support to Satyajit Tambe )

नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर थोरात साखर कारखाना गेट, घुलेवाडी या ठिकाणी सत्यजीत तांबेंच्या विजयाचे निकालाआधीच बॅनर लागले आहेत. मात्र, या बॅनरवर बाळासाहेब थोरातांचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

Satyajit Tambe News
Satyajit Tambe MLC election news

एकीकडे अपक्ष फॉर्म भरल्याने सत्यजीत तांबे तसेच त्यांचे सुधीर तांबे यांना कॉंग्रेस पक्षाने निलंबित केले. तर दुसरीकडे तांबेंच्या विजयी पोस्टरवर थोरात झळकल्याने चर्चेला उत आला आहे. अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा तर्क लावण्यात येत आहे.

थोरात आमचे कुटुंब प्रमुख; तांबेंचे सुचक वक्तव्य चर्चेत

नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तांबे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. सत्यजित तांबे यांनी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्याविरोधातच दंड थोपटले असल्याची चर्चा राज्यात रंगली. मात्र, दुसरीकडे सत्यजित तांबे यांच्या बंडामागे थेट बाळासाहेब थोरात यांचीच प्रेरणा असल्याचे सांगण्यात आले होते.

त्यानंतर, एका मुलाखतीदरम्यान, तुम्हाला मामांचा पाठिंबा आहे का? असे विचारले असता तांबे म्हणाले, ‘थोरात आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आम्ही एका परिवारातील आहोत,’ असे सूचक वक्तव्य तांबे यांनी केले होते.

मागील राजकीय घडामोडी पाहता आणि आज निकाला दिवशी झळकलेले पोस्टर पाहता बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याच्या चर्चेला उत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीत ‘ऑल इज वेल’चा दावा; पण उमेदवारी अर्जावेळी दोन मंत्री, प्रमुख नेते अन् जिल्हाध्यक्ष अनुपस्थित, कारण काय?

India and Oman CEPA: भारत-ओमान करार लागू! होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर ही डील इतकी महत्त्वाची का? उद्योगांसाठी गेमचेंजर ठरणार

MBA MMS CET Exam Result : एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल जाहीर; एकूण ८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

Bhimashankar News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून होणार दर्शनासाठी खुले

Thane: ठाण्यात राजकीय उलाढाल! विद्यमान सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; ठाकरे गट-मनसेला धक्का

SCROLL FOR NEXT