gunaratna sadavarte objection on Sagesoyare word manoj jarange Maratha Reservation latest News  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : सगेसोयरे अन् ब्लड रिलेटीव्ह यात फरक तरी काय? सदावर्तेंनी सांगितली पुस्तकातील व्याख्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज मोठं यश मिळालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्वच महत्वाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.

रोहित कणसे

Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज मोठं यश मिळालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्वच महत्वाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर देखील सरकारने जारी केला आहे. या सुधारित जीआरमध्ये कुणबी नोंदी असणाऱ्यांना तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रणाणपत्र दिलं जाणार आहे. यादरम्यान वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र आज मनोज जरांगेंना देण्यात आलेल्या जीआरमध्ये नवीन काहीच नसल्याचे म्हटले आहे.

मनोज जरांगे यांनी सगेसोयरेची मागणी केली. मी तुम्हाला पुस्तकातील व्याख्या दाखवली. सगेसोयरे आणि ब्लड रिलेटीव्ह यांच्यात काय फरक आहे? ब्लड रिलेटीव्ह असेल तरच सगेसोयरा असतो. त्यामुळे मला असं वाटतं की, मला गुराखी भाषेतला शब्द वापरायचा नाही. कारण मी गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे. म्हणजे कढीला उत वगैरे काही म्हणायचं नाही. त्यामुळे यामध्ये नवीन काही आहे असं मला वाटत नाही. सर्वांनी सुखरुप घरी जावं. जरांगेंनी सुखरुप घरी जावं. जरांगेंनी खरंच उपवास केला असेल तर स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ३०७ सारखे गुन्हे वापस घेतले जाऊ शकतात का? अशा गुन्ह्यांना रिपोर्ट फाइल केला जाऊ शकतो का? पोलिसांवरील हल्ल्याचे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात का? सर्वोच्च न्यायालयाने एसटी महामंडळाच्या बसेस फोडले त्याबद्दल काय निर्देश दिले आहेत? हे मला सांगा. माझ्या गाडीच्या काचा फोडल्या ते पैसे जो आंदोलनाची घोषणा करतो आणि जे सहभागी होतात यांच्या खिशातून वसूल करायचे आहेत. मला वाटत नाही की असे कोणतेही गुन्हे वापस घेतले जाऊ शकतात.

मुंबई उच्च न्यायालयाचा मार्लापल्ले साहेबांच्या जजमेंटनंतर सरकारची ही नोटीस टिकू शकेल असं वाटत नाही असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. सोमवारी इत्यंभूत गोष्ट सर्वांसमोर येईल थोडी वाट बघा असेही सदावर्ते यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT