BJP Devendra Fadanvis slam Uddhav Thackeray sharad pawar over bhagatsingh koshyari controversy political news  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: अखेर पोटातलं ओठावर; 2019 मध्ये नेमकं काय घडलं? तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

2019 सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला असल्याचा केला गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजप आणि इतर पक्षातील नेते वारंवांर काही ना काही गौप्यस्फोट करत असतात. अशातच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. 2019 सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला असल्याचं तानाजी सांवत यांनी म्हंटलं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो जनतेने कल ही आमच्या बाजुने दिला माञ उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दिडशे बैठका घेतल्या असल्याचा डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.

सावंत यांच्या या गौप्यस्फोटाने राज्यातील सत्ता बदलात माझा काही हात नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी या आधी सांगितल होतं. पण सावंत यांनी सत्ताबदलात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा सांगितल्यामुळे यापूर्वी फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संशय निर्माण झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

त्यानंतर पुढे बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, मला मंत्री पदावरून डावल्यानंतर धाराशिव जिल्हापरिषदमध्ये मी भाजप बरोबर सत्ता स्थापन करून बंड सुरू केलं. मातोश्रीवर जाऊन हे सरकार बदल केल्याशिवाय शांत राहणार नाही. परत मातोश्रीचे तोंड ही बघणार नसल्याचंही मातोश्रीवर जाऊन सांगून आल्याचं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली आहे. तर उध्दव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. 2019 साली नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजप सेनेला लोकांनी बहुमत दिले असतानाही आमच्या युतीत मिठाचा खडा महाराष्ट्राचे जाणते राजे या नावाने भारतभर ओळखले जाणाऱ्यांनी टाकला असल्याचं सांगत तानाजी सावंत यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT