Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार, तर महाराष्ट्रात पुढील तीन दिवस प्रतीक्षा

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे आता चिंता आणखी वाढली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. अंदाजाप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मात्र त्यानंतर पावसाचा जोर पुन्हा ओसरला. अशातच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे.

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे पुढचे किमान तीन दिवस तरी राज्यात पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शुक्रवारी म्हणजेच 25 ऑगस्टपासून कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टाही वायव्येला सरकला आहे. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असलं तरीही काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस नाहीच. राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे शेतीच्या कामांचा वेग मंदावला आहे. अनेक भागांमध्ये पाणीकपात पुन्हा एकदा लागू करण्यात आली आहे. तर, मुंबईत उन्हाच्या झळा लागत आहेत.

देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार

हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरीही या भागांमध्ये दरडी कोसळण्याचं सत्र सध्या सुरुच आहे. मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT