Weather Update : हिमाचल प्रदेशात पुन्हा मुसळधार! देशात ७ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी

Weather Update
Weather Update Esakal

अतिवृष्टी, भूस्खलन यामुळे उध्वस्त झालेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. विभागाने या सात राज्यांसाठी 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने हिमाचल आणि उत्तराखंड येथे 115.6 ते 204.4 मि मिमीपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या काळात बाधित भागात पूर आणि भूस्खलनाची शक्यता असल्याचे सांगितले. याशिवाय वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांत मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.

या राज्यांमध्ये 250 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातही 22 आणि 23 ऑगस्ट रोजी 115.6 ते 204.4 मिमी पर्यंत अतिवृष्टी अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. 4 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. 4 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो.

Weather Update
Viral Video : टीव्ही अँकरचा टॉमॅटो दरवाढीवर प्रश्न अन् स्मृती इराणींनी करून दिली थेट तुरूंगाची आठवण

ईशान्येकडील राज्यांमध्येही जोरदार पाऊस

हवामान विभागाने राजस्थानसह इशान्येकडील मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मिझोराममध्येही पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागानुसार काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

Weather Update
Jailer Vs Gadar 2 Box Office Collection : रजनीच्या जेलरनं ५०० कोटींचा टप्पा ओलांडला, गदर २ थंडावला!

केंद्र हिमाचलला देणार 200 कोटी

रविवारी केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशसाठी मदत म्हणून 200 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, केंद्राने 10 आणि 17 जुलै रोजी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्रीय हिश्श्यातून 360.80 कोटी रुपये आगाऊ मंजूर केले आहेत. तसेच एनडीआरएफच्या 20 तुकड्या, लष्कराच्या 9 तुकड्या आणि हवाई दलाची 3 हेलिकॉप्टर बचाव आणि मदतकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com