High-speed bus crashes into the platform at Sinnar Bus Stand in Nashik, causing chaos and severe injuries among waiting passengers.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

Sinnar Bus stand Accident in Nashik : थरारक घटना सीसीटीव्हीत कैद; या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

High-Speed Bus Lost Control in Sinnar Busstand: नाशिकमधील सिन्रर बसस्थानक एक अतिशय भीषण अपघात आज घडला आहे. या ठिकाणी वेगात आलेली महामंडळाची एक बस थेट फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्येच घुसली. यामुळे एकच गोंधळ उडाला, प्रवाशांची मोठी आरडाओरड झाली.

सध्या हाती आलेल्या माहितीनुसार या भीषण दुर्घटनेत एका नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

बस नेमकी कोणत्या कारणामुळे अनियंत्रित झाली. यामध्ये चालकाची काही चूक होती की, बसचा ब्रेक निकामी झाला होता. याची शोध घेतला जात आहे. दरम्यान, बस आधी थेट प्रवाशांमध्ये घुसली आणि त्यानंतर मग पुन्हा मागे गेल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे.

बस आली तेव्हा नेहमीप्रमाणे फलाटावर प्रवाशांची गर्दी होती. या प्रवाशांमध्ये काही महिला, वृद्धांचाही समावेश होता. भरधाव बसची धडक बसल्याने प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसने धडक दिली आणि पुन्हा मागे गेली तेव्हा प्रवाशांची मोठी आरडाओरड सुरू होती.

फलटावरील अन्य काही प्रवासी मागे गेलेल्या बसकडे धावल्याचेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तर अचानक घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे सिन्नर बसस्थानकात प्रवाशांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT