Amit Shah Pune Visit Sakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah Pune Visit: 'राजकीय भेटी ते CRCS पोर्टलचे उद्घाटन', असं आहे अमित शहांच्या पुणे दौऱ्याचं वेळापत्रक

Amit Shah Pune Visit: कार्यक्रमानंतर अमित शहा राज्यातील प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत

राहुल शेळके

Amit Shah Pune Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर चारच दिवसांनी अमित शाह पुण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

अमित शहा हे शनिवारी रात्री पुण्यात पोचले. ते दौऱ्याअधीच पुण्यात 40 मिनिटे अधीच आल्याने गोंधळ उडाला पण शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही मंडळी एकाच हॉटेमध्ये दाखल झाली. 

केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ते दिल्लीला रवाना होतील.

या कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमानंतर ते राज्यातील प्रमुख नेत्यांशी; तसेच इतर घटकांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. त्यासाठी इतर जाहीर कार्यक्रम टाळण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

चिंचवड येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या 'डिजिटल पोर्टल'चे उदघाटन अमित शाह रविवारी दुपारी बारा वाजता करणार आहेत.

देशात 1,550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत. त्यांचे कामकाज सुलभ व्हावे म्हणून हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

असं आहे अमित शहांच्या पुणे दौऱ्याचं वेळापत्रक

  • केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाचेच्या डिजिटल पोर्टलचे करणार उदघाटन

  • चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम

  • या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील राहणार उपस्थित

  • राज्याच्या मंत्री मंडळाच्या विस्तार संदर्भात चर्चा होणार

  • दुपारी 1 वाजता अमित शहा दिल्लीला जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT