Sameer Wankhede ANI
महाराष्ट्र बातम्या

समीर वानखेडेंच्या नियुक्तीत अमित शाह कनेक्शन? पत्रातून गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (aryan khan drugs case) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer sameer wankhede) यांचे पाय खोलात गेल्याचे दिसतेय. मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) अधिक आक्रमक झाले असून ते वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. कालच त्यांनी ट्विटरवरून वानखेडेंच्या जन्माचा दाखला शेअर केला होता. आता एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र (NCB letter to nawab malik) पाठवलं असून ते मलिकांनी ट्विट केलंय. त्यामध्ये अनेक नवनवीन खुलासे करण्यात आले आहेत. समीर वानखेडेंची नियुक्ती कशी झाली? याबाबत गंभीर आरोप करण्यात आला आहे.

एनसीबीच्या अज्ञात कर्मचाऱ्याने लिहिलेल्या पत्रामध्ये समीर वानखेडे यांच्या नियुक्तीबाबत उल्लेख करण्यात आला आहे. ''सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्सची चौकशी एनसीबीकडे सोपविण्यात आली होती. त्यासाठी माजी अधिकारी राकेश अस्थाना यांनी एक एसआयटी स्थापन करून कमलप्रितसिंह मल्होत्रा यांना या समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांना सांगून महसूल विभागात काम करणारे समीर वानखेडे यांची अवैधपणे एनसीबीच्या झोनल डायरेक्टरपदी नियुक्ती केली. त्यांना राकेश अस्थाना यांनी साम-दाम-दंड भेदाचा वापर करून बॉलीवूडच्या कलाकारांना अडकविण्याचे आदेश दिले. त्यासाठी बॉलीवूड कलाकारांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून समीर वानखेडे आणि मल्होत्रा यांनी बॉलीवूड कलाकारांना करोडो रुपयांची मागणी केली. त्यापैकी काही हिस्सा हा राकेश अस्थाना यांना देखील जात होता. हे सर्व पैसे त्यांचे वकील अयाज खान यांनी गोळा करून दिला'', असे गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहे.

NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याने नवाब मलिक यांना लिहिलेले पत्र

पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय -

एनसीबीतील एका अधिकाऱ्याने मला पत्र पाठवलं असून दोन दिवसाआधी मला ते मिळालंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र दिलं असून यामध्ये २६ प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. बॉलीवूड कलाकारांकडून कशी वसुली केली जाते आणि कशी चुकीची कामे केली जातात याचा उल्लेख या पत्रात आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT