Devendra Fadnavis Astrology sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis Astrology : फडणवीसांची केंद्रात वर्णी लागणार? ज्योतिषी म्हणतात, नवीन वर्षी मोठी जबाबदारी येणार...

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले की फडणवीसांसाठी हे वर्षही थोडं त्रासदायक असणार

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis Astrology : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सद्यस्थिती विचित्र आहे. त्यामुळेच सत्ता हातात असतानाही त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होता आले नाही. 2022 हे वर्ष त्यांच्यासाठी खूप संकटमय होतं. 2022 मध्ये विरोधीपक्ष नेते असताना त्यांची सत्ता मिळवण्याची तळमळ प्रत्येकाने पाहली. मात्र जेव्हा सत्ता हातात आली तेव्हा उच्च पदही मिळालं नाही. उपमुख्यमंत्री पदावर त्यांनी समाधान मानलं.

जसं 2022 हे वर्ष गेलं तसंच फडणवीसांचं 2023 हे वर्ष जाणार का? फडणवीसांचं 2023 हे वर्ष कसं जाणार? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.

देवेंद्र फडणीसांविषयी बोलताना महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) म्हणाले की फडणवीसांसाठी हे वर्षही थोडं त्रासदायक असणार पण त्यातूनही त्यांना पुढे फायदा होणार आहे.

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रहस्थितीनुसार त्यांना येणाऱ्या नविन वर्षात साल 2022 प्रमाणे थोड त्रासदायक आहे. त्यांना मोठ्या घटनांना सामोरं जाव लागेल. मात्र हा या मोठ्या घटना त्यांच्यासाठी लाभदायक ठरतील."

यासह त्यांच्या कडे मोठी जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रात देखील त्यांची वर्णी लागू शकेल. वर्षाच्या अखेरीस म्हणजेच दिवाळीच्या दरम्यान किंवा त्या नंतर त्यांना उच्च नेतृत्व प्राप्त होऊ शकते असेही महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 100 डॉलर पार! देशात नवे इंधन दर जाहीर; तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर किती?

Thackeray Brothers on Student Protest: विद्यार्थी आंदोलनाने ठाकरे बंधू एकवटले; आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी ठाकरेंची दुसरी पिढी मैदानात

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडकवासला धरण 100 टक्के भरले; 4800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू

Godavari River Floods Nashik : नाशिक पुराच्या विळख्यात! दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठावर हायअलर्ट, पाहा स्थिती

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT