Narendra Modi Astrology : नवीन वर्षात मोदींवर भारी पडणार का राहूल गांधी? काय सांगतात ज्योतिषी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Astrology

Narendra Modi Astrology : नवीन वर्षात मोदींवर भारी पडणार का राहूल गांधी? काय सांगतात ज्योतिषी

Narendra Modi Astrology : सध्या सगळीकडे नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. त्यामुळे प्रत्येकजण येणाऱ्या नवीन वर्षाकडे उत्साहाने पाहतोय. आपलं नवं वर्ष कसं जाणार, याची उत्सूकता प्रत्येकाला असते. पण तुम्हाला माहिती आहे का मोदींचं नवीन वर्ष कसं जाणार?

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) यांनी मोदींचं नवं वर्ष कसं जाणार याविषयी सांगितले आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया. (astrology how will be new year for pm Narendra Modi read story)

हेही वाचा: New Year 2023 Resolutions: मुलांना नव्या वर्षाचे संकल्प काय सुचवाल; पुर्ण करून घेण्याची सोप्पी ट्रिक!

ग्रहस्थिती नुसार यांना येणारे नविन वर्ष नेत्रदिपक कामगिरी करण्यासाठी सुयोग्य ठरणार आहे. येत्या नविन वर्षात नरेंद्र मोदीजींच्या हस्ते मोठे ऐतिहासिक निर्णय होऊ शकतील, ज्यातून उत्कृष्ट सफलता त्यांना प्राप्त होईल.

हेही वाचा: New Year 2023 : नववर्षाचे स्वागत उत्साहात करा पण नियम मोडल्यास कारवाई होणार...

ज्यात प्रामुख्याने समान नागरी कायदा, आर्थिक निकषांनुसार आरक्षण असेल, तत्सम देशहितकारक निर्णय असे महत्वपुर्ण निर्णय पंतप्रधान मोदी घेऊ शकतील. त्यांच्या मनोकामना देखील येत्या नविन वर्षात पुर्ण होतील.

हेही वाचा: New Year Celebration : नवीन वर्षात घरीच बनवा हेल्दी केक, जाणून घ्या खास रेसिपी

फेब्रु- मार्च 2023 नंतरचा काळ त्यांच्यासाठी लाभदायक असून महत्वपुर्ण असे मोठे निर्णय या नंतर त्यांनी घ्यावे तथा ते घेतील. यासह संकटमयी काळ या वर्षात त्यांच्या कुंडलीतील ग्रह भावांध्ये नसल्याने संपुर्ण वर्ष त्यांच्यासाठी उत्तम फलदायी अन् महत्वपुर्ण ठरेल.