SSC and HSC Board Sakal
महाराष्ट्र बातम्या

HSC Exam: महाराष्ट्रात बारावीची परीक्षा अखेर रद्द

विनायक होगाडे

पुणे : सीबीएसईने (CBSE Exams) बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता महाराष्ट्रानेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बारावीच्या परीक्षा (HSC Exams) रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषित केलं आहे. (HSC exams 2021 Cancelled in Maharashtra 12th board exams student education department)

गुरुवारी झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजूर केला आहे. शिक्षणमंत्र्यांकडून परीक्षा रद्द करण्याबाबतची फाईल आपत्ती व्यवस्थापन विभागाला काल पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज विभागाने यास मंजूरी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेशने गुरुवारी सकाळी याबाबत जाहीर केलं होतं.

HSC Exam

बुधवारी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या की, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला याबाबतची फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची यासंदर्भात बैठक होईल. त्यात ते या फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार तुम्हाला अतिरिक्त माहिती देण्यात येईल. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT