दुसऱ्या लाटेत सहाशेहून अधिक डॉक्टरांचा मृत्यू; IMAने दिली आकडेवारी

Doctors
DoctorsSakal

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या लाटेमध्ये एका टप्प्यावर दैनंदिन रुग्णसंख्या ही चार लाखांच्या पार सापडत होती. तर बरेच दिवस ती तीन लाखांच्या पारदेखील गेली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण झाला आहे. या लाटेशी दोन हात करणारे फ्रंटलाईन वर्कर्स जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. कोरोनाशी मुकाबला करताना देशात अनेक डॉक्टर्सनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. (As of June 2 total of 624 doctors died in the second wave of COVID 19 Indian Medical Association)

Doctors
DoctorsSakal

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किती डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती आता इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. IMA ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात दुसऱ्या लाटेमध्ये तब्बल 624 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 23 डॉक्टरांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्यू दिल्लीमधील डॉक्टरांचा झाला आहे. दिल्लीमध्ये 109 डॉक्टर कोरोनाच्या संकटात मृत्यूमुखी पडले आहेत. त्याखालोखाल मृत्यू हे बिहारमध्ये झाले असून 96 डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 79 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

Doctors
TET Certificate आता आजीवन वैध; 7 वर्षे मुदतीची अट रद्द
Doctors
DoctorsSakal

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशात एक लाख 34 हजार 154 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन हजार 887 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत दोन लाख 11 हजार 499 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप कोरोना संकट संपलेलं नाही. बुधवारी 74 हजार 458 उपचाराधीन रुग्ण घटले आहेत. मागील महिनाभरापासून नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच देशातील उपचाराधीन रुग्णांच संख्या सातत्यानं कमी होत आहे. देशात सध्या 17 लाख 13 हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात बुधवारी जवळपास 15 हजार रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात नवीन कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com