Weather update  sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता, उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा

Weather Update : देशभरात कडाक्याची थंडी जाणवत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरात कडाक्याची थंडी जाणवत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवसात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

तर उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. दाट धुक्यामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथील अनेक घटकांवर त्यांचा परिणाम झाला आहे. तर बांगलादेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह काश्मीर खोऱ्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यापासून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी आहे.

पुढील तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात पावसासाठी पोषण वातावरण निर्माण झाल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली, नोएडा, गाजियाबादसह इतर भागांमध्ये किरकोळ पाऊस झाला. यामुळे थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्य आणि उत्तर दिल्लीमध्ये पावसाची शक्यता आहे.

दिल्लीत सध्या दाट धुक्याचा परिणाम दिसून येत आहे. घसरलेले तापमान आणि दाट धुक्यामुळे रेल्वे आणि उड्डाणे रद्द होत आहेत. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 150 हून अधिक उड्डाणे उशीरा झाली आहेत. बुधवारी दिल्लीत हलके ते दाट धुके पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. सकाळी 8.30 नंतर काही काळ धुके दूर होऊ शकते.

रेल्वे गाड्या विलंबाने

सोमवारी दिल्लीत २६ ट्रेन उशिराने धावत असल्याचे भारतीय रेल्वेने सांगितले. मंगळवारीही दाट धुक्यामुळे सुमारे 20 गाड्यांवर परिणाम झाला. दिल्लीतील दाट धुके आणि खराब हवामानाचा प्रभाव बुधवारी (२४ जानेवारी)ही कायम राहणार आहे. दिल्लीत येणाऱ्या-जाणाऱ्या २४ पेक्षा अधिक गाड्या उशिराने धावत आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानक, आनंद विहार रेल्वे स्थानक आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर प्रवासी तासन्तास रेल्वे गाड्यांची वाट पाहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT