कॅनडात परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येवर निर्बंध ; व्हिसावर दोन वर्षांसाठी कपात,घरांच्या किमती वाढल्याने उपाय

कॅनडात घरांच्या किमती आकाशाला भिडल्या असून या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी कॅनडा सरकारने परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसात दोन वर्षांसाठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी व्हिसामध्ये २०२४ मध्ये ३५ टक्के कपात केली जाणार आहे.
students
studentssakal

टोरंटो : कॅनडात घरांच्या किमती आकाशाला भिडल्या असून या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी कॅनडा सरकारने परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसात दोन वर्षांसाठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी व्हिसामध्ये २०२४ मध्ये ३५ टक्के कपात केली जाणार आहे.

गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि इतर सेवांवरील ताण कमी करण्यासाठी कॅनडाने हे पाऊल उचलले आहे. येथील स्थलांतर मंत्री मार्क मिलर यांनी हा निर्णय सोमवारी जाहीर केला. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसावर दोन वर्षांची मर्यादा जाहीर केली. ओटावात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘‘२०२४ मध्ये नवीन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसामध्ये ३५ टक्के कपात केली जाईल. नवीन विद्यार्थी व्हिसाची संख्या तीन लाख ६४ हजारांपर्यंत कमी करण्यात येईल. गेल्या वर्षी सुमारे पाच लाख ६० हजार व्हिसा जारी केले होते. देशाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यक्रमाचा गैरफायदा घेत फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गृहनिर्माण आणि आरोग्य सेवेवर ताण येत असल्याने देशात दरवर्षी प्रवेश करणाऱ्यांची संख्या स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

शिक्षणाच्या हे कॅनडात स्थायिक होण्याचा मार्ग

‘‘परदेशी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शुल्काच्या बदल्यात दर्जेदार शिक्षण न देता त्याचा फायदा काही महाविद्यालये घेत आहेत. काही घटनांमध्ये कॅनडातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे हा येथे स्थायिक होण्याचा मार्ग ठरला आहे. अनेकदा विद्यार्थी कॅनडातील अत्यंत हलक्या दर्जाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन वाणिज्य किंवा व्यावसायिक शिक्षण घेऊन नंतर ते खासगी टॅक्सीचालक बनतात. तुम्हाला कॅनडात खासगी कंपन्यांसाठी वाहनचालकाचे काम करायचे असेल तर मी वेगळी व्यवस्था करीन. पण आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यक्रमाचा तो हेतू नाही,’’ असे मिलर म्हणाले.

कॅनडा सरकारचा हा निर्णय म्हणजे येथील गोंधळात भर टाकणारा आहे आणि बनावट महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांना परवाने दिल्याबद्दल जस्टिन ट्रुडो जबाबदार आहेत.

- पियरे पॉइलीव्हरे, विरोधी नेते, कॉन्झरव्हेटिव्ह पक्ष

भारतावर परिणाम

कॅनडातील परदेशी विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के भारतातून येतात, अशी नोंद २०२२ मधील अधिकृत आकडेवारीत आहे. चिनी विद्यार्थ्यांचे प्रमाण १२ टक्के आहे. नवा निर्णय लागू झाल्यानंतर त्याचा सर्वांत मोठा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसणार आहे. विद्यापीठांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणे फायदेशीर ठरते. या विद्यार्थ्यांच्या बळावर कॅनडातील अनेक शैक्षणिक संस्था नफा कमवितात. पण नवीन निर्णयाचा महाविद्यालयांना मोठा फटका बसणार आहे. कॅनडात अनेक रेस्टॉरंट आणि अनेक व्यवसाय आहे. त्यांनाही परदेशी विद्यार्थ्यांमुळे फायदा होतो. या व्यवसायांवरही आता परिणाम होणार आहे.

परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवा प्रस्ताव

पदव्युत्तर शिक्षणानंतर काम करण्याच्या परवान्यांवरही मर्यादेचा विचार

पदव्युत्तर आणि पीएच.डीनंतरचा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी तीन वर्षांसाठी काम करण्याचा परवाना मिळविण्यास पात्र ठरतील

२०२५ साठीच्या परवाना मंजुरीसाठी यावर्षअखेरीस पुन्हा मूल्यांकन करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com