Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: अजित पवारांच्या बोलण्याचा CM शिंदेंवर इम्पॅक्ट; पाहुणचार खर्चाला कात्री

चहात सोन्याचं पाणी घातलं होतं काय? अजित पवारांनी केला होता संतप्त सवाल

धनश्री ओतारी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा बंगल्याचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख अस सांगत चहात सोन्याचं पाणी घातलं होतं काय? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं पाहुणचार खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्याचा CM शिंदेंवर इम्पॅक्ट अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Impact of Ajit Pawar speech on CM Shinde )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी निवासस्थानी येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी जाहीर केला.

शिंदे सरकारनं सरकारी निवासस्थानवरील पाहुणचार खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षा बंगल्यासह सागर निवासस्थानवरील खर्चही आटोक्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही निवासस्थानावरील पाहुणचार खर्चाच कंत्राट दोन वेगवेगळ्या खासगी कंत्राटधारकांना देण्यात आलं आहे.

या दोन्ही निवासस्थानी खानपानासाठी अंदाजित खर्च अनुक्रमे ३.५० कोटी आणि १.५० कोटी इतका असल्याचे सांगण्यात आले. वर्षा आणि सागर या निवासस्थानी मान्यवर अतिथींसाठी खानपान सेवा पुरविणाऱ्या पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी अंदाजित ५ कोटी रुपयांची ई-निविदा गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती.

या करारानुसार विविध पदार्थांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भात या दोन्ही निविदाकारांशी करार करण्यात आला असून अटी आणि शर्थी पुरवठादारास बंधनकारक असणार आहेत.

वर्षा सागरसाठी दर निश्चित

वेफर्स १० रुपये

मसाला चहा १४ रुपये

मसाला दुध १५ रुपये

कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक- १५ रुपये

साधारण शाकाहारी बुफे- १६० रुपये

विशेष शाकाहारी बुफे- ३२५ रुपये

साधारण मांसाहारी बुफे- १७५ रुपये

अजित पवार काय म्हणाले होते?

राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधल होता. यावेळी त्यांनी सरकारी निवासस्थानवरी खानपानाचं भाष्य केलं होतं. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याचं ४ महिन्यांचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख रुपये आलेलं आहे.

प्रसारमाध्यमांनी तशा बातम्या दिलेल्या आहेत. वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय? असा संतप्त सवाल पवारांनी उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

Cheesy Popeye Poppers Recipe: बाहेरून कुरकुरीत, आतून चीजने भरलेले; पालक आणि काळ्या चण्यांपासून बनवा झटपट स्नॅक्स

आजचे राशिभविष्य - 21 ऑक्टोबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑक्टोबर 2026

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

SCROLL FOR NEXT